Thursday, August 13, 2020

Lonawala Trip @१४_०७_२०१९

Click by me at my home

Click by me at my home

Some special memories

Lonawala 

लोणावळा

           एकदा Office मध्ये काम करत असताना माझा मित्र रोहितने मला विचारलं.

     राहुल, तु लोणावळ्याला पर्यटनाला येणार का...?, आम्ही शाळेतील मित्र जाणार आहोत.

     मी काही न विचार करता लगेच हो म्हंटलो. तारीख वगैरे सगळं ठरलेलं होतं, रोहितने सर्व माहिती दिली आणि मी तयार खुप आनंदी, उत्साहात घरी आलो माझ्या आईला सांगितलो आणि तिथून लगेच नकाराची घंटी वाजली.

      खूप सारे प्रश्न, शंका आणि भीती माझ्या मम्मीच कधीच एकट्याने मी कुठे कधी गेलो नव्हतो म्हणून होते. पण मी शांत बसून समजावलं की, माझ्या सोबत चांगले मित्र आहेत आणि लोणावळा पुणेच्या थोडंसं पुढे आहे काही होणार नाही नीट जाऊन एका दिवसात रात्रीच परत येणार आहोत असे खूप काही सांगून मनावलं आणि पर्यटन म्हणजे ट्रिप साठी तयार झालो.

     दुसऱ्या दिवशी ट्रिपला जाण्यासाठी रेल्वे टिकीट काढून सगळं रेडी. तस आधीच ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी ६ च्या रेल्वेच Reservation करुन ५ दिवस आधीच सगळं Ok करून ठेवलो होतो.

      मागील वर्षी सन २०१९ मध्ये आजच्या दिवशी म्हणजे १४ जुलै, २०१९ या दिवशी माझं पहिल पर्यटन लोनावळ्याला पूर्ण केलो. आम्ही सगळे भरल्या पपहाटे उठून मस्त ठंडी With पाऊस या वातावरणात खंड पाण्याचे आंघोळ करून छान आवरून पहाटे ५.३० ला रेल्वे स्टेशन वर भेटलो. 

      Actually सांगायचे तर या दिवशी मला माहित नव्हते कोण कोण येणार होते परंतु ८ जण मित्र आहेत एवढेच माहीत होतं. सगळे भेटलो मग कळेल की हे सगळे रोहीतचे Classment आहेत, पण आश्चर्य म्हणजे त्यातील खूप सारे माझे ओळखीचे मित्र होते. 

    तर अशा प्रकारे Surprising आणि interesting ट्रीपची सुरुवात झाली. यातील अजून ऐक surprise सांगायचं म्हणजे हे की, आम्ही आधी एकूण मित्र ठरवलेली ते ८ जण परंतू त्या दिवशी अजून ३ मित्र तयार होऊन आले जे आधी नाही येणार म्हंटले होते. त्यांच्या साठी normal साध तिकीट काढून Reservation सीट वरच बसलो.

     पुढे जाताना फुलं मस्ती, timepass, चेष्टा-मस्करी करत अस आमचं हे interesting ट्रीप निघाल लोणावळ्याला. पुढे आम्ही रेल्वेच्या वेळेनुसार पाऊण तास उशिराने पोहचलो. आमच्या मध्ये fact ऐका मित्रा ला पुढच्या local च time माहीत होते आणि योगायोग की आम्ही just अस उतरलो आणि बाजूलाच local येऊन थांबल होत. आम्ही सगळे गेलो त्या मध्ये आणि आमचे २ मित्र म्हणजे १ ला ट्रीप Orgniser आणि २ रा ट्रिप manager, te गेले local ची ticket आणायला आम्ही local train मध्ये जाऊन बसलो आणि मग तिथून थोडंसं लांब लोणावळा.

    पुढे इथे पण full मस्ती, धमाल आणि चेष्टा मस्करी सुरू पण मी थंडी मुले गप बसुन होतो बाकी सगळे फुलं busy होते नंतर मी पण थोडंसं लक्ष दिल आणि enjoyment चालू झालं, खूप हसलो, सर्वांचे शाळेचे गोष्टी ऐकत होते आणि सगळ्याच secret बाहेर येत होते ते लक्ष देऊन ऐकत होतो. आणि मग एकदाच आमचं वाट बघणं संपल आणि आम्ही लोणावळ्याला दुपारी ठीक १२.३० ला. पोहचलो.

    रेल्वे स्टेशन वर उतरल्या उतरल्या लगेच selfie Session चालू झालं तिथून आम्ही बाहेर आलो ऐका Hotel मध्ये जायचं ठरवले कारण सगळे पहाटे उठून आलो होतो आणि train मध्ये थोडा फार waffers वगैरे खालो होतो so Khup bhuk लागलं होतं पुढे कुठे जमणार न्हवत कारण खूप हवा आणि पाऊस Continue chalu होत तरी ट्रीप ची मज्जा घ्यायचं होत यासाठी आम्ही रेल्वे स्टेशन बाहेरील hotel मध्येच जेवलो आणि निघालो पुढे. मस्त पावसात भिजत चालत लोणावळा घाट बघायला. तिथे पण खूप सारे लोक आधी पासूनच येऊन trafic chya line मध्ये कार मध्ये बसून हळू हळू पुढे येत होते आणि आम्ही काही अडचण नाही निवांत पावसात भिजत चालत बॅग घेऊन तसाच पुढें जातं होतो आजुबाजूच नैसर्गिक वातावरणात गारवा आणि पाऊस full Enjoy करत भिजत पुढें निघालो.

     पाऊस माझा सर्वात जास्त आवडणारा season आणि यात माझ्या मनासारखं निसर्गाचं आनंद घेत पावसात भिजत खूप मन मोकळे पणाने हे सर्व अनुभव आणि आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. मग पुढे आल ऐक छोटंसं धबधबा पण इथे खूप गर्दी नीट enjoy करता येईल असा तर वाटतं न्हवत म्हणून आम्ही सगळे अजून पुढें गेलो. तिथे आम्ही बॅग वगैरे ऐका ठिकाणी जमा करून पुढे गेलो. धरणाचं पाणी बघायला आणि तिथे जोरात पावसाचं आगमन अजून खूपच भारी वातावरण. आम्ही सगळे पाण्यात खूप भिजलो खूप सारे photo, video आणि selfie घेऊन खूप enjoy केलो.

     मग तिथून निघालो आम्ही बॅग घेतली पाऊस थांबलेला परंतू तिथे पाऊस म्हंटले तर ५ मिनिटातच अंतर ५ मिनिट मध्ये माणूस पूर्ण भिजून अंघोळ करून गोरा होईल इतकं जोरात पाऊस सारखं ये जा करत होत. तिथून आम्ही निघालो तेव्हा मध्येच पाऊस चालू झालं पण आता आम्ही सगळे already भिजलेले होतो म्हणून तसच ऐका छोट्याश्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी गेलो तेवढ्यात पुन्हा पावसाची हजेरी. पण या वेळेस पाऊस खूप वेळ होत so आम्ही खूप वेळ तिथेच उभे होतो. काही वेळाने पाऊस कमी झालं पण चालू होत हळू हळू तरी आम्ही ओलेच होतो म्हणून पुढे तसाच निघालो. 

    पुढे पुढे पाऊस पूर्ण पने गेलं म्हणून आम्ही selfie घेत बाकीचे त्यांच्या futur partner सोबत video call वर busy झाले काही वेळात मी, रोहित आणि अजून २ मित्र मागे मागे लोणावळा special चिक्की घेण्यात busy झालो तो पर्यंत बाकीचे पुढे रेल्वे स्टेशन कडे निघाले होते कारण local पकडून पुणे स्टेशन ल जायचं होत संध्याकाळीच ६. वाजता ची सोलापूर ची रेल्वे miss होईल या भीतीने ते गेले पुढें आम्ही ४ जण मागे होतो. आम्ही थोडा पोधे गेलो आणि तिथे आम्ही लोणावळा डोंगर ट्रेकिंग करत खूप वर पर्यंत गेलो तिथून धबधब्या सारखं पण खूप कमी अस पाणी वाहत खाली येत होत आम्ही तिथून खूप वर पर्यंत ट्रेक करत खूप वर गेलो खूप सारे photo selfie घेऊन खूप वेळाने खाली आलो. आणि मग एवढं call येत होते उशीर होतोय म्हणून आम्ही परत निघालो स्टेशन कडे पुढे वाटेत पुन्हा पाऊस थंडी कारण खूप भिजलो होतो त्या दिवशी ते आजही पुन्हा जावस वाटत आहे पण ते शक्य नाही.

     पुढें आम्ही मस्त अस पावसात भिजत होतो काही वेळाने पाऊस थांबल आणि चालत जात होतो तेवढ्यात तिथे गरम आहे मक्याचं वास येत होत आणि सो आम्ही काही ना विचार करता ते घेऊन मस्त थंडीमध्ये गरम गरम खात पुढे निघालो आम्ही खर त्या tirp ची मज्जा केल्याचे वाटत होते कारण montain tracking is always special thing. आम्ही स्टेशन वर पोहचलो तेव्हा ५.३० वाजले होते सगळे खूप रागावले नंतर माहीत होत की ७ ला चैन्नई मैल ही रेल्वे असते सोलापूरला, सगळे पुन्हा गडबड मध्ये होते. पण मला माहीत होत आम्ही वेळेवर तिथे पोहचू शकणार नाही आणि जो मित्र पुणे मध्ये राहतो तो मित्र पण गपच होता कारण त्याला पण माहीत होत local ६.१५ la आहे आणि आम्ही एवढं लवकर तिथे जाऊन लगेच ticket घेऊ शकणार नव्हतो.

      मग पुन्हा आम्ही आवरून कपडे बदलून local ने station वर पोहलो. पण रेल्वे नव्हतेच म्हणून आम्ही सगळे आधी जेवायला स्टेशन बाहेर ऐका हॉटेल मध्ये गेलो छान जेवलो तिथून निघालो travel bus बघण्या साठी. शेवटी ऐका ठिकाणी पोहचलो, तिथे सर्व travel buses थांबतात जे सोलापूरला जातात. आम्ही तिथे गेलो ticket booking केेलो आणि रात्री १२.३० ल bus निघणार होते म्हणून सगळे मस्त time pass करत बसलो ११ ला bus आले आम्ही सगळे त्यात बसलो सगळे मस्त जागा बघून बसलो आणि bus निघायचं वाट बघत बसलो आम्ही मग एकदाच ते bus निघाल सोलापूरला आणि पहाटे ५.३० ला आम्ही सोलापूरला पोहचलो.


      या ट्रिपची काही खास आठवण आहेत आणि सर्वात जास्त special आहे ते म्हणजे हे ट्रिप मी माझ्या salary च्या पैशातून पूर्ण केलेले आहे. आणि खूप मनापासून मन मोकळे पणाने ते सर्व अनुभव घेतलो आनंद अनुभवल्या कारण शेवटी सगळ्या गोष्टी ज्याने त्रास होत त्यापासून निसर्ग पासूनच मिळणार आनंद खूप प्रभाव पडतो आपल्या मनावर. मी खूप खूष होतो आणि खूप सारे आठवणी मनात घेऊन ते ट्रिप मनापासून आठवण करतो.





....

   



....




....




Written by me, Thank you for reading this amazing experience.

अनकही बातें...

 उन राहों को छोड़ देना चाहिए, जिन में हम असफल हो रहे हैं। उन ख्वाबों को तोड़ देना चाहिए, जिन में हम सो रहे हैं। उस मायूसी से उभर कर, मन की स...