Tuesday, July 21, 2020

Unpredictable घटना

काही आठवणी घेऊनी येतात आनंद,

तर मन करुनी जातात उदास...

मावळणारा सूर्य करतो प्रसन्न,
तर अमावस्येचा चंद्र अप्रसन्न...

आईचा चेहरा असतो हसरा,
तर मनात गहन चिंता आणि भीत...

ध्येय निश्चित करण्यात सोपं नसतं,
त्याहून ही अवघड असते ध्येयाचे मार्ग...

असच काही सुचलं म्हणुन सांगतो,
हे आहे माझे शब्द, यामध्ये असतील तुमचे विचार...

      आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात, पण ते कधीच ठरवलेल्या नसतात, म्हणजे एखादी गोष्ट जे न ठरवता आपण पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो आणि ते पूर्ण झाल्यावर अवीलक्षन आनंद होते. अशी अनेक उदाहरणे आहेत, माझे स्वतःचे अनुभव आणि आठवणी जे मी तुम्हाला सांगणार आहे. 

     मूळात "Unpredictable" म्हणजे ज्यांचे कधी अंदाजही बांधता येतो नाही, असेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे आणि ते कधीच थांबणार ही नाही. आपल्या सर्वांच्या बाबतीत असे काही घडलेलं असेल किंवा भविष्यात घडेल पण ही गोष्ट किंवा घटना खूप आनंद देऊन जाते किंवा काही अनुभव देते.

     तर काही घटना घडतात आणि काहीना काही शिकवून जातात, असेच आज आपण अनुभवतो आहोत. अर्थात कोरोना आणि त्यानंतर झालेली काही अनपेक्षित बदल. याचाच परिणाम म्हणून आपण अनपेक्षित बदल अनुभवतो आहोत. कोरोनामूळे आज आपण घरी राहून काम करत आहेत आणि त्याच सोबत घरातील अशा अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. तर एक नवल अनुभव म्हणुन आपण एकजुटीने प्रयत्न करत आहेत. काही सामाजिक अपवाद वगळता आज आपण एकत्र आहोत.

     आज खूप सारे मुले-मुली पासून मोठ्या वयातील सर्वांना काही तरी नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने कुटुंबातील प्रत्येक जण एकमेकांना मदत करुन नवीन्यासाठी शिकवून देत आहेत.

     असेच काहीसे माझ्या बाबतीत आहे. मी कधी अपेक्षा केलो नाही की मी स्वतः मधील कला ओळखला मिळेल, यामध्ये एक खास मदत आणि प्रेरणा घेऊन माझ्या मित्राने सुचवले "तुझ्या कलेला प्रोत्साहन दे आणि आणखी जास्त प्रयत्न केला तर तूझी कला सर्वांना नक्की आवडेल." मी अजून सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि मला यशाची अपेक्षा नाही पण तितकंच आनंद मिळतो हे कळाले आहे. 

This one made by me in last earlier days

This one is click by me in Rain season

     तर इतकेच नाही तर घरी बसून Social Media चा वापर हे चांगल्या पद्धतीने करता येईल हे फक्त माहिती होते आज ते कळत ही आहे. यामुळे आपण स्वतःला ओळखून स्वतःला प्रोत्साहित करुन अनेक खूप सारे "Unpredictable" म्हणजे अनपेक्षित घटनांचा आनंद घेता येतो तुम्हीही प्रयत्न करत रहा. 
धन्यवाद!





राहुल अलकुंटे

.

No comments:

Post a Comment

अनकही बातें...

 उन राहों को छोड़ देना चाहिए, जिन में हम असफल हो रहे हैं। उन ख्वाबों को तोड़ देना चाहिए, जिन में हम सो रहे हैं। उस मायूसी से उभर कर, मन की स...